मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये सहा. प्रा. अरुण ढंग बी. एस. आय टी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान लक्षात घेत स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२३ पुरस्कृत इ.एस.एफ.ई., बेन वंडर्स स्किल शेअर इंडिया, वरळी, मुंबई यांच्या वतीने सहा. प्रा. अरुण रामचंद्र ढंग यांना मोस्ट एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटी रत्नागिरीसाठीचा पुरस्कार महाविद्यालयाच्या वतीने आयोजित “युवा जल्लोष” या कार्यक्रमात मंडणगड गटविकास अधिकारी विशाल जाधव तसेच उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे तसेच मंडणगड तालुक्यातील सन्माननीय व्यक्तीच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
अरुण ढंग हे शिक्षण क्षेत्रात २००९ पासून कार्यरत असून त्यांचे शिक्षण एम. सी. ए., एम. एस्सी.(फिजिक्स), एल. एल. बी., एम.फील, पर्यंतचे शिक्षण घेतले असून सद्या ते संगणक शास्त्र विषयात पी.एच्. डी. करीत आहेत.
सदर पुरस्कारासाठी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची प्रेरणा तसेच महाविद्यालयाचे समनव्यक डॉ. अंशुमन मगर तसेच शिक्षक वृंद यांचे सहकार्याने तसेच या पुरस्कारासाठी कुटुंबीय, आई वडील, पत्नी, मुली, भाऊ, बहिण यांचे योगदान असल्याचे सांगितले. या पुरस्कारासाठी सर्वच क्षेत्रातून अरुण ढंग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.