स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त बालदिंडी सोहळा

 रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिंडी सोहळा रविवार दि.10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते 9.00 वाजेपर्यंत संपन्न होत आहे.गाडीतळ ते अध्यात्ममंदिर हा मार्ग असून रत्नागिरी शहरातील अनेक शाळांमधील बालकलाकार वारकरी पेहरावात सहभागी होत असून सदर बालदिंडी सोहळा पाहण्याचा लाभ रत्नागिरीतील तमाम नागरिकांनी घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.