वाडीबीड रसाळगड रस्त्याचे भुमीपुजन १० लाख रुपयांचा निधी मंजूर

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील रसाळगड वाडी बीड रस्त्याला आमदार निधीमधून १० लक्ष रु मंजूर झाले असून सदर रस्त्याचे भूमिपूजन सेना संघटक प्रकाश मोहिते यांचे हस्ते संपन्न झाले.

आंबवली विभागातील १८ गावातील देवतांच्या पालख्या याच रस्त्यावरून यात्रा उत्सवासाठी प्रस्थान करतात. पर्यटनासाठी चालना मिळण्यासाठी या रस्त्याची अनेक वर्षे मागणी करण्यात येत होती सदर रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिले आहे.

कार्यक्रमा साठी शाखा प्रमुख प्रकाश कदम, महेश मोरे, महिपत घोलप, दिलीप साबळे आदी सेना पदाधिकारी उपस्थित होते.