खेड, सुकीवली मध्ये गावठी हातभट्टीच्या दारुअड्ड्यावर धाड

crime

खेड(प्रतिनिधी)खेड शहरातील क्रोष्टीआळी येथील गावठी हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. .या धाडीत बेकायदेशीररित्या चढ्या दराने दारूची विक्री केल्याप्रकरणी प्रकाश हरिश्चंद्र जाधव यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७२० रूपये किंमतीची १२ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली.

 

तसेच सुकीवली चोरद नदी परिसरात सुरू असलेल्या गावठी दारू धंद्यावर धाड टाकून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे युवराज माने, प्रहलाद महागावकर , रोशन महागावकर असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत