चिपळूण (वार्ताहर) : मार्गताम्हाणे पंचक्रोशी व्यापारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता रामपूर गुढे फाट्याजवळ चैतन्य मंगल कार्यालयात होणार असून सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मार्गताम्हाणे पंचक्रोशी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी केले आहे. प्रत्येक गावातील व्यापाऱ्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमंत्रण दिल्याचे साळवी यांनी सांगितले.










