संस्थेने साधली पुरस्काराची हॅट्ट्रिक
पुरस्काराबद्दल संस्थेवर होतोय अभिनंदनचा वर्षाव
लांजा | प्रतिनिधी : तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अग्रणी पतसंस्था अशी ओळख असलेल्या लांजा नागरिक सहकारी पतसंस्थेला सलग तिसऱ्यांदा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे .त्यामुळे पतसंस्थेने या पुरस्काराची हॅट्ट्रिक साधली आहे.महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना व त्यांच्या कार्यांना प्रोत्साहन म्हणून अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या मार्फत बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देण्यात येतो. लांजा सहकारी पतसंस्थेला मिळालेला हा पुरस्कार १५ कोटी ते २० कोटी ठेवींच्या गटातून उत्तम गुणपत्रकानुसार प्राप्त झाला आहे.
लांजा नागरी पतसंस्था ३२ वर्षे सभासदांच्या सेवेत कार्यरत आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख हा दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र असून दिनांक ३१ जानेवारी २०२३ अखेर मुख्यालय व तीन शाखा सापुचेतळे, भांबेड व साटवली येथे कार्यरत आहेत. ३१ जानेवारी २०२३ अखेर संस्थेच्या ठेवी २३ कोटी १९ लाख झालेल्या असून ३१ मार्च २०२३ अखेर ३० कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्याचा संस्थेचा मानस आहे.संस्थेच्या एकूणच प्रगतीचा आलेख लक्षात घेऊन बँक ऑफ रिबन पुरस्कार सलग तिसऱ्यांदा संस्थेला प्राप्त झाला आहे .सदरचा पुरस्कार १५ मार्च ते १७ मार्च या दरम्यान महाबळेश्वर येथे होणाऱ्या कार्यक्रमात संस्थेला पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे .संस्थेच्या या पुरस्कारामध्ये संस्थेचे सर्व ठेवीदार कर्जदार हितचिंतक सभासद आणि संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्ग यांचा मोठा वाटा असल्याचे संस्थेचे चेअरमन शिवाजी कोत्रे आणि व्हाईस चेअरमन अभिजीत गांधी यांनी म्हटले आहे. संस्थेचे जागरूक सभासद, नियमित कर्जफेड करणारे कर्जदार तसेच संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर रूमडे तसेच सर्व कर्मचारी व प्रतिनिधी यांचे या कामी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.