रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या कोषाध्यक्षपदी व्यंकटेश कररा यांची निवड झाली आहे. व्यंकटेश कररा यांनी 2002 साली अधिकृत मार्शल आर्ट तायक्वांदो खेळाच प्रशिक्षण जिल्ह्यात प्रथम सुरू केलं. शासनाच्या स्वयंसिद्ध प्रकल्पनांतर्गत जिल्ह्यात मुली आणि महिला याना प्रशिक्षण दिलं. त्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील ज्यूडो अधिकृत क्रीडा संघटना निलेश गोयथळे, चेनारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटेश कररा यांनी सुरू केली.
जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांची ओळख करून देत त्यांना संघटनांच्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या व्यंकटेश कररा याना वयाच्या 34 व्या वर्षी नेहरू युवा केंद्र भारत सरकार युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. क्रीडा खात्याचा गुणवंत क्रीडा संघटक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला पुरस्कार आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यासोबतच हैद्राबाद येथे प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड मनुष्यबळ विकास पत्रकार संघ यांचा पुरस्कार निशिगंधा वाड हस्ते, नाशिक येथे प्रतिभा क्रीडा पुरस्कार शाहीर विठ्ठल उमप यांच्या हस्ते मिळाला आहे. क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे व्यंकटेश कररा हे
अलोरे ग्रामपंचायत तंटामुक्त समिती सदस्य म्हणूनही काम करतात. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.