देवगड जामसंडे नगरपंचायत येथील सफाई कामगार बंधु भगिनींच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सफाई कामगार युनियन नामफलकाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायत कामगार युनियनच्या अध्यक्षपदी श्री पुरुषोत्तम घाडी,सरचिटणीस पदी श्री महेश दळवी,उपाध्यक्ष पदी श्रीमती विकांक्षा जाधव,चिटणीस पदी श्री सागर मोंडकर,खजिनदार पदी श्री तुषार लोणे,सल्लागार पदी श्री निलेश जगताप,सदस्य पदी श्री उमेश घाडी,श्री मंगेश घाडी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळीराज्य सहचिटणीस सर्वेश सावंत,उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री,तालुकाध्यक्ष संतोष मयेकर, महेश नलावडे उपस्थित होते
यावेळी सर्वप्रथम युनियन फलक उद्घाटन करण्यात आले, त्यानंतर उपस्थित सभासद कामगार बांधवांना सह चिटणीस श्री सर्वेश सावंत यांनी मार्गदर्शन केले,या सोबत नगरपंचायत अधिकारी यासोबत संबंधित युनियन च्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.सदर प्रसंगी महिला आघाडीच्या सौ. प्रांजल राणे. उप विभाग अध्यक्षा,(मानखुर्द विधानसभा)माजी विभाग अध्यक्षा,वानिवडे सौ अर्पिता राघव महाराष्ट्र सैनीक बबलू परब, महेश नलावडे,हेमंत मोंडकर, सिद्धार्थ जाधव,सचिन राणे इत्यादी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक तसेच कामगार युनियन सभासद उपस्थित होते….












