को रे मार्गा वरून धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस अपग्रेड होण्याच्या प्रतीक्षेत ! 

२५ वर्षांत गाडीमध्ये कोणतीही सुधारणा नाही 

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खेड(प्रतिनिधी) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरू स्थानकांदरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस गेली २५ वर्षे अविरत प्रवाशांच्या सेवेत आहे. मात्र आजतागायत या ट्रेनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्यात आलेले नाहीत.

 

 

ना ट्रेनच्या डब्यांची अवस्था नीटनेटकी, ना प्रवाशांची सुरक्षा. यामुळे या गाडीला एलएचबी कोचची जोडणी करावी, अशी मागणी कोकण रेल्वे विकास समितीकडून करण्यात येत आहे. यामुळे जुनाट डबे, असुरक्षित प्रवास यातून प्रवाशांची सुटका होत मत्स्यगंधा एक्स्प्रेसला नवसंजीवनी कधी मिळणार? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान ७४१ किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी पहिली प्रवासीसेवा गाडी

म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसने याच वर्षी आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले आहे. ट्रेन क्रमांक १२६१९ / १२६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती. आजतागायत २५ वर्षे ही गाडी धावत आहे.

 

 

मात्र सध्या या गाडीची अवस्था पाहता एक्स्प्रेसच्या सद्यस्थितीबद्दल प्रवाशांकडून चिंता आणि निराशा व्यक्त करण्यात येत आहे. ट्रेनच्या रेकची स्थिती बिघडत चालली आहे. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहेआणि वेग दोन्ही गोष्टी साध्य करता येतील, अशी माहिती कोकण रेल्वे विकास समितीकडून देण्यात आली. दरम्यान, ही रेल्वे त्रिवेंद्रम विभागाकडे असल्याने यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे अधिकार या विभागाला असून दक्षिण रेल्वेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही समितीकडून सांगण्यात आले.

 

रेल्वे अभ्यासक म्हापदी यांची रेल्वे बोर्डाकडे मागणी

 

या गाडीला अपग्रेड करण्याची नितांत गरज आहे, अशा मागणीचा एक ई-मेल रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वेबोर्ड आणि संबंधित आस्थापनांना केला आहे. ही मागणी वेळीच पूर्ण झाल्यास लांब पल्ल्याच्या गाडीचा

आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेस अनेक वर्षांपासून या भागातील प्रवासी, पर्यटक आणि व्यापारी यांच्यासाठी जीवनवाहिनी आहे; परंतु आता झीज होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत या गाडीला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता असून या गाडीला एलएचबी डबे जोडल्यास सुरक्षा प्रवास आरामदायक होईलच आणि सुरक्षितसुद्धा होईल, असे महापदी यांनी सांगितले.

दरम्यान, मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी नवीन एलएचबी रेकच्या वाटपाला प्राधान्य देण्यासाठी दक्षिण रेल्वेने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील म्हापदी यांनी केली आहे.