गॅस सिलेंडर धारकांची ई केवायसी अपडेटसाठी गॅस एजन्सीमध्ये झुंबड

भर उन्हात महिला व वृध्दांची होतेय परवड

प्रशासन व एजन्सी धारकांनी गाव पातळीवर नियोजन करण्याची माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांची मागणी

राजापूर (प्रतिनिधी): शासनाने गॅस सिलेंडर वितरणातील त्रुटी, बोगस गॅस सिलेंडर कनेक्शन यांचा शोध घेऊन गॅस वितरणात अधिकाधिक सुसुत्रीकरण आण्यासाठी गॅस सिलेंडर धारकांनी ई केवायसी करणे बंधनकार केले आहे. यासाठी शासनाकडून ३१ डिसेंबर ही अंतिम तारिख देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राजापुरात गॅस एजन्सीमध्ये ई केवायसी अपडेडसाठी एकच झुंबड उडाली आहे. भर उन्हात महिला व वृध्द यांना रांग लावावी लागत असून त्यामुळे परवड होत आहे. तरी प्रशासन व गॅस एजन्सी धारकांनी अशा प्रकारे ई केवायसी अपडेडसाठी ग्रामीण भागात शिबीरांचे आयोजन करावे अशी मागणी राजापुरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी केली आहे.

तर यासाठी ३१ डिसेंबरच्या पुढे मुदत वाढवून द्यावी अशी मागणी काझी यांनी केली आहे. यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे काझी यांनी सांगितले.
शासनाने गॅस सिलेंडर वितरणातील त्रुटी, बोगस गॅस सिलेंडर कनेक्शन यांचा शोध घेऊन गॅस वितरणात अधिकाधिक सुसुत्रीकरण आण्यासाठी गॅस सिलेंडर धारकांनी ई केवायसी करणे बंधनकार केले आहे. यासाठी शासनाकडून ३१ डिसेंबर ही अंतिम तारिख देण्यात आली आहे. यासाठी गॅस सिलेंडर धारकांनी आपले आधार कार्ड घेऊन गॅस एजन्सीमध्ये जाऊन थंपींग करून आपली ई केवायसी अपडेट करावयची आहे. याबाबत यापुर्वी एजन्सी धारकांकडून यापुर्वी गॅस सिलेंडर धारकांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता अंतिम मुदत संपत आल्याने ही ई केवायसी करणेसाठी गॅस सिलेंडर धारकांनी त्या त्या गॅस एजन्सीमध्ये गर्दी केली आहे. राजापुरात राजापूर कोदवली साईनगर, नाटे व पाचल भागात गँस वितरण करणाऱ्या एजन्सीज आहे. तालुक्यात सुमारे ४० हजाररेक्षा अधिक गॅस सिलेंडर धारक ग्राहक आहेत. सध्या या एजन्सीच्या ठिकाणी सध्या ग्रामीण भागातील गॅस सिलेंडर धारकांची झुंबड उडाली आहे. सकाळपासून रांगा लावून अनेकजण आपली केवासी अपडेड करत आहेत.

मात्र यात महिला, वृध्द यांना नाहक मनस्ताप होत असून यासाठी प्रशासन व एजन्सीधारकांनी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी त्या त्या भागात ई केवायसी अपडेट साठी शिबीरांचे आयोजन करावे अशी मागाणी काझी यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे काझी यांनी सांगितले. तर या ई केवायसी अपडेट साठी आणखी मुदत वाढवून द्यावी अशीही मागणी करणार असल्याचे काझी यांनी सांगितले.
अशा प्रकारे ई केवायसी करण्यासाठी गुगल प्ले अॅपवर Hello BPCL हे अॅप डाऊनलोड करून घरबसल्याही ग्राहकांना आपली केवायसी अपडेट करता येणार आहे. तशी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.