विकसित भारत संकल्प यात्रा उद्या मालवणात

मालवण | प्रतिनिधी : शासनाच्या विविध योजनांचा जनतेला लाभ देण्याच्या उद्देशाने निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा शनिवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपरी 12 यावेळेत मालवण शहरात दाखल होणार आहे. भरड नाका येथील बाणावलीकर कंपाऊंड येथे यात्रा वाहन राहणार असून आधार कार्ड अदयावत करणे, आयुष्यमान कार्ड शिबिर, पंतप्रधान स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आरोग्य शिबिर आदी योजनांची नागरीकांना माहिती व लाभ मिळवून दिला जाणार आहे. तरी याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.