मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी केतन सावंत यांची नियुक्ती

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी केतन सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. या बाबत नियुक्तीचे पत्र विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी पक्ष निरीक्षक संदीप दळवी, गजानन राणे ,जिल्हा संपर्क अध्यक्ष. महेश परब व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांसाठी प्रेरणादायी काम करण्यात येणार असून लवकरच अमित ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत.

नवनियुक्त विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर ,उप जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ ,तालुका अध्यक्ष. मिलिंद सावंत यांनी अभिनंदन केले आहे.