भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात

रत्नागिरी : भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हा, तालुका, बेसिक आणि शहर महिला मोर्चा या रत्नागिरी दक्षिण, समस्त भाजपा महिला मोर्चा ची बैठक भाजपा नेते बाळासाहेब माने आणि जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. सुजाता ताई साळवी यांच्या उपस्थितीत पार पडली.

जिल्हाअध्यक्ष राजेश सावंत यांनी महिला पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या कार्य बद्दल कौतुक केले. “आज मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या मुळे महिला सक्षमीकरण होत आहे. मोदीजी नी ३५% महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. तेव्हा प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांनी भविष्यात विधानसभा लढवायचे धेय्य ठेवावे व यासाठी भाऊ म्हणून मी सदैव पाठीशी उभा राहीन. लक्ष्मी, सरस्वती होऊन आपल्या योजना जनसामान्यान पर्यंत पोहचवा आणि वेळेस देवी दुर्गा बनून विरोधकांन वर आक्रमक व्हा. विधानसभा ते पंचायत जास्तीत जास्त महिला उमेदवार तयार व्हा, असे बोलून सगळ्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.”

बाळासाहेब माने यांनी सौ. सुजाता ताई साळवी यांच्या आणि महिला मोर्चा च्या कार्याचे कौतुक केले. “आज सर्व जनसामान्यांना भाजपा पक्षाकडूनच विकासाची अपेक्षा आहे. भाजपा स्थापने आधीपासून ते आतापर्यंतचा भारतीय जन संघाचा खडतर प्रवास त्यांनी सांगितला. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे, तुम्ही भाग्यवान आहात की हे दिव्य याची देही याची डोळा बघण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. आज आपल्या पक्षामुळे आणि मोदींच्या झपाट्याच्या विकसित कार्यामुळे आज पूर्ण जग आपली दाखल घेत आहे. प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांनी “संकल्प से सिध्दी” हे ध्येय ठेवून वॉर्ड ते वॉर्ड फिरावे आणि आपल्या योजना जनसामान्य पर्यंत पोहचाव्यात. भाजपा चे पदाधिकारी म्हणून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या गुणांना अंगिकारा.” यावेळी शहरअध्यक्ष राजन फाळके, भाजपा शहर पदाधिकारी आणि महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.