वैभववाडी महोत्सवचे आज उदघाटन

Google search engine
Google search engine

खाद्यमहोत्सव, रस्सीखेच व सौंदर्यस्पर्धांचे आयोजन

रोटरी क्लब कडून महोत्सवाची जय्यत तयारी

वैभववाडी | प्रतिनिधी :
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने दि. 16 ते 17 फेब्रुवारी 2023 रोजी वैभववाडी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत चालणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून खाद्यमहोत्सव, बाल महोत्सव व विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.उदघाटन प्रसंगी तहसीलदार प्रसन्नजित चव्हाण, पोलीस निरीक्षक अमित यादव, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासिर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे प्रेसिडेंट संतोष टक्के यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
या महोत्सवाचा लाभ तालुक्यातील विद्यार्थ्याना महिलांना व खेळाडुंना होणार आहे. तसेच वैभववाडी तालुक्याच्या सांस्कृतीक परंपरेत मोलाची भर पडणार आहे. या महोत्सवात वैशिष्ट पुर्ण अशी रस्सीखेच स्पर्धा आयोजीत करणेत आली आहे.
खाद्यामहोत्सव या महोत्सवाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना त्यांचे खाद्य पदार्थ व साहित्य विक्री करण्यासाठी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या खाद्य महोत्सवात 24 स्टाॅल असून कोकणातील विविध खाद्य पदार्थ खव्वय्यांना खाण्यासाठी मिळणार आहेत. व कोकणी पदार्थ साहित्य खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
रस्सीखेच स्पर्धा- स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रत्येक गावाचा एक संघ अपेक्षित असून या संघामध्ये रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. 15 खेळाडुंची टीम व 1 कप्तान या संघात असणार आहेत. स्पर्धा विजेत्यास 4 फुटी ढाल व रोख 3000 रु. पारितोषिक, उपविजेत्यास 3 फुटी ढाल व रोख 2000 रु. पारितोषिक व तृतीय विजेत्यास 2 फुटी ढाल व रोख 1000रु पारितोषिक देण्यात येणार आहे.
सौदर्य स्पर्धा- ही स्पर्धा  मुलीसाठी, वैभव कन्या महिलांसाठी वैभवलक्ष्मी  तरुणासाठी वैभवरत्न व उभयतांसाठी वैभववाडी आयडाॅल अशा चार विभागात होणार असून स्पर्धा दोन फेऱ्या मध्ये होणार आहे.
गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2023 रोजी दु. 3 वा. उदघाटन समारंभ सायंकाळी 3.30 ते 6.30 या वेळेत रस्सीखेच स्पर्धा, संध्याकाळी 7 ते 9 सौंदर्य स्पर्धा, प्राथमिक फेरी व रात्रौ 9.30 ते 11 तालुक्यातील विद्यार्थ्याचा सांस्कृतीक महोत्सव,
शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळात रस्सीखेच स्पर्धा, संध्याकाळी 7 ते 9 सौंदर्य स्पर्धा, अंतिम फेरी, रात्रौ 9 ते 9.30 सामाजिक शैक्षणिक क्षैत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार व विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ रात्रौ 9.30 ते 11 जिल्हायातील कलाकारांचा सांस्कृतीक महोत्सव.
या महोत्सवासाठी विशेंष अतिथी म्हणून आमदार नितेशजी राणे,  रोटरी डिस्ट्रिक गव्हर्णर रो. बबन देशपांडे, वैभववाडी नगरध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, 2023-24 चे रोटरी डिस्ट्रिक गव्हर्णर रो.नासीरभाई, डिस्ट्रिक्ट हेड रो.प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्णर रो. दिपक बेलवलकर, तहसिलदार, गटविकास अधिकार, पोलिस निरिक्षक व नगरपंचायतीचे सर्व  नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
या वैभववाडी महोत्सवाचा तालुक्यातील व जिल्हयातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे प्रेसीडेंट रो. संतोष श्रीधर टक्के, सेक्रेटरी  रो.संजय शिवाजी रावराणे व टेझरर रो. प्रशांत धनाजी गुळेकर यांनी केले आहे.
या महोत्सव व स्पर्धाच्या अधिक माहितीसाठी श्री. संतोष टक्के 9423300274, श्री. संजय रावराणे 9422379345, श्री.‌ विद्याधर सावंत 8459468693, श्री. सचिन रावराणे 9890281764 यांचेशी संपर्क साधावा.