लांजा( प्रतिनिधी) अयोध्या मध्ये झालेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त लांजा शहरांमध्ये देखील प्रभू श्रीरामांची मोठी प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
लांजा एसटी स्टँड समोरील जागेमध्ये प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिकृती आणि दिपोत्सव साजरा करण्यात आला.तसेच रात्री फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. तत्पूर्वी लांजातील बजरंग दलाचे सर्व बजरंगी यांनी आणि उपस्थित नागरिकांनी अयोध्येतील कारसेवेमध्ये बलिदान झालेल्या कोठारी बंधूना श्रद्धांजली वाहिली.
कै.शरद कोठारी आणि कै.रामकुमार कोठारी या दोघा भावांना अयोध्येतीमध्ये कारसेवा करत असताना पोलिसांनी क्रूरपणे गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.त्यांच्यासारख्या अनेक हिंदूंचे देखील श्रीराम मंदिर होण्यासाठी बलिदान झाले आहे.या सर्वांच्याच बलिदानामुळे अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर आज उभे राहिले आहे ,असे विचार डॉ.श्री. समीर घोरपडे यांनी विचार मांडले.
दरम्यान, शहरातील श्रीरामाची प्रतिकृती लांज्यामध्ये विशेष आकर्षणाचा, चर्चेचा विषय ठरला होता.लांजातील अनेक हिंदू नागरिकांनी या ठिकाणी येऊन प्रतिकृतीसमोर फोटो काढत आहेत ,सेल्फी काढत आहेत. आणि सगळ्यांच्या मुखामध्ये एकच शब्द आहे’ जय श्रीराम.











