हुंबरीत २७ पासून मावळा चषक क्रिकेट स्पर्धा

खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील हुंबरी वरचीवाडी येथील बाळ गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने २७ व २८ जानेवारी रोजी मावळा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

स्पर्धेतील विजेत्यास ५००१ रुपये, उपविजेत्यास ३००१ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांनाही चषक देवून गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत बहसंख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.