वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठीही देणगी
शिरगाव (वार्ताहर) शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी राजेंद्र थोरात यांच्याकडून या प्रशालेच्या ग्रंथालयास १३२५० रुपये किमतीची ५३ पुस्तकांची देणगी स्वरूपात भेट दिली आहे.
विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी व पुणे येथे राहत असलेले राजेंद्र थोरात यांनी या प्रशालेतील ग्रंथालयास १३२५० रुपये किमतीची ५३ पुस्तकरुपी देणगी दिली आहे.
तसेच याप्रशालेच्या मागासवर्गीय वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची देणगी देऊन या कामासाठी मोठा हातभार लावला आहे.
राजेंद्र थोरात यांनी शाळेला दिलेल्या मोलाच्या देणगीबद्दल त्यांचे संस्थेच्या व शाळेच्यावतीने आभार मानले आहेत
यावेळी माजी विद्यार्थी राजेंद्र थोरात, इंद्रायनी थोरात, संगीता वायंगणकर, सुधीर साटम, प्रसाद साटम, राजेंद्र साटम, या प्रशालेचे प्राचार्य शमशुद्दीन आत्तार, व्हि डी लब्दे, आदिनाथप्रसाद गर्जॅ आदी उपस्थित होते.












