दोडामार्ग केंद्रशाळेचे नुतन इमारत उद्घाटन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी थांबविले!!!

Google search engine
Google search engine

दोडामार्ग : प्रतिनीधी
दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाची असलेली शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नूतन इमारतीचे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही शुक्रवारी कोणालाही कल्पना न देता उदघाटन होणार होते ही बाब लक्षात आणून देत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व नगरसेवकांनी हा कार्यक्रम थाबंविला.
जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा नगरपंचायत प्रशासन तसेच प्रसार माध्यमे या सर्वांनाच कोणतीही पूर्वकल्पना न देता अपूर्ण शाळा इमारतीचं थेट उद्घाटन करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष चव्हाण यांनी केला. काही झाले तरी काम पूर्ण करा, लोकप्रतनिधीं आणि स्थानिक नगरपंचायत यांना विश्वासात घेऊनच या शाळा इमारतीचं उद्घाटन करा अशा शब्दांत चव्हाण यांनी अधिकारी सुनावले आहे. अखेर नगराध्यक्ष यांच्या या आक्रमक पवित्र्याने अखेर सीईओ प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत नियोजित आखलेला उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द करावा लागला. माञ नगराध्यक्ष व सहकारी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे