देवगड | प्रतिनिधी : देवगड बंदरात नागेश्वर प्रसाद नौके वरील खलाशी सुयोग बुवा नाचणकर यांच्या मृतदेह मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास देवगड खाडीच्या पाण्यात आढळला मिळालेल्या माहितीनुसार देवगड बंदरातील मनोहर प्रमोद बांदेकर यांच्या मालकीच्या नागेश्वर प्रसाद या नौकेवर सुयोग बुवा नाचणकर वय ४४ राहणार पाचल तालुका राजापूर हा खलाशी म्हणून कामास होता. दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी रात्री नोकेवर जेवण झाल्यानंतर इतर खलाशांसमवेत तो झोपला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तो तांडेल यांना नौकेवर दिसला नाही. म्हणून त्याची शोधाशोध सुरू केली त्यांनी याबाबत नौका मालकांना ही माहिती दिली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत आढळून आला. याबाबतची खबर नौका मालक मनोहर बांदेकर यांनी देवगड पोलिसात दिली. असून आणि आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.याबाबतचा अधिक तपास पो.हे कॉ राजन जाधव करत आहेत .












