दाणोली समाधी मंदिर व निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
दाणोली येथील समर्थ सदगुरु साटम महाराजांचा ८६ वा पुण्यतिथी सोहळा गुरूवार ९ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात समाधी मंदिरात पहाटे ४:३० वाजता काकड आरती, सकाळी ५ वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ७ वाजता ह भ प श्री कल्याणकर बुवा मुंबई यांचे सुश्राव्य कीर्तन, सकाळी ८ वाजता सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्याहस्ते साटम महाराज समाधी पूजन व पाद्यपूजा विधिवत करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता श्री घाटकर (कोलगाव) यांचे बासरी वादन, सकाळी १० वाजता ह भ प श्रीराम झारापरकर यांचे सुश्राव्य किर्तन, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १२:३० वाजता श्री सामंत बुवा (झाराप) यांचे भजन, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी १:३० वाजता अभंग व भक्ती गीतांचा सुरेख नजराणा ( राधाकृष्ण संगीत साधना सौ विणाताई दळवी प्रस्तुत), सायंकाळी ३ वाजता श्री गावडे (सावंतवाडी) यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ४ वाजता ह भ प श्री नातु बुवा (पुणे) यांचे कीर्तन, सात वाजता आरती, साडे ७ वाजता दाणोली हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ .३० वाजता सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार असून त्यानंतर मध्यरात्री २ वाजता आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
महाराजांच्या निवासस्थानीही भजन कीर्तन होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थांचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंतभोसले आणि विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले यांनी केले आहे.











