सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात होणार श्रींचे आगमन
लांजा (प्रतिनिधी) सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ लांजाच्या वतीने यावर्षी मंगळवार दिनांक १३ ते २३ फेब्रुवारी ते या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
लांजाचा राजा या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या ३२ वर्षे हा उत्सव साजरा केला जात असून यावर्षी ३३ व्या वर्षात हे मंडळ पदार्पण करत आहे. सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात श्रींचे आगमन होणार आहे. मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी श्री मुदोबा भजन मंडळ केळंबे यांचे भजन ,रात्री ८.३० वाजता नवलादेवी सेवाभावी मंडळाचे भजन, बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ वेरवली यांचे भजन आणि त्यानंतर लांजा शाळा नंबर एकचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतील. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता श्रीदेवी भगवती प्रासादिक मंडळाचे भजन आणि त्यानंतर लांजा तालुका वारकरी संघटनेचा हरीपाठाचा कार्यक्रम होईल.
शुक्रवारी १६ फेब्रुवारी रात्री ८.३० वाजता श्री संत गोरोबाकाका भजन मंडळ कुंभारवाडी यांचे भजन आणि श्सरी त्य विनायकाची महापूजा. त्याचप्रमाणे झी टॉकीज प्रेम बाल कीर्तनकार ह भ प माऊली महाराज राऊरकर आळंदी यांचे किर्तनाचा कार्यक्रम होईल.शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ लांजाचे भजन आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ चे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतील. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता साईनाथ प्रासादिक भजन मंडळाचे भजन आणि त्यानंतर श्री गणेश इव्हेंट प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर स्पर्धा होतील. सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी रात्री श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ इंदवटी यांचे भजन आणि त्यानंतर बाजारपेठ मित्र मंडळ लांजाच्या वतीने जल्लोष २०२४ हा कार्यक्रम सादर होईल.
मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी ८.३० वाजता चैतन्य भजन मंडळ मधील कुंभारवाडी यांचे भजन आणि त्या नंतर जि. प. केंद्र शाळा झरेवाडी रत्नागिरी यांच्या महाराष्ट्र रंग, संस्कृतीचा कलाविष्कार कार्यक्रम सादर होईल. दिनांक २१ रोजी ८ वाजता महाआरती, नंतर वाजता भोवत्या, ९ वाजता श्री ओंकारेश्वर प्रासादिक भजन मंडळ जावडे यांचे भजन आणि त्यानंतर कोकणचा साज, संगमेश्वरी बाज हा धमाल कॉमेडी कार्यक्रम सादर होईल. गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी श्रींचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून रात्री ८.३० वाजता श्री नवलादेवी सेवाभावी मंडळ कोत्रेवाडी यांचे भजन होणार आहे .शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी श्रींच्या विसर्जनाचा कार्यक्रम होईल. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत उत्तर पूजा, आरती आणि त्यानंतर सायंकाळी श्रींचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ लांजाचे अध्यक्ष संतोष खवळे, उपाध्यक्ष रुपेश पाथरे व सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.











