बार्टी, पुणे अंतर्गत वणंद येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

दापोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), पुणे अंतर्गत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक गोष्टीमध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्याच्या वणंद, दापोली या गावामध्ये बार्टी पुणे अंतर्गत विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.

बार्टी मार्फत पुस्तके वाटप, यामध्ये 15%दराने पुस्तके वाटप केले जाणार आहे. त्याप्रमाणे उपस्थितीत लोकांसाठी मोफत भोजन व्यवस्था देखील केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मोफत संविधान च्या उद्देशिका वाटप केले जाणार आहे

माता रमाई यांना अभिवादन करण्यासाठी सुनील वारे साहेब (महासंचालक, बार्टी पुणे ), अधिकारी वर्ग उपस्थितीत राहणार आहेत.