माघी गणेश जयंती निमित्त आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : करुळ भोयडेवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे. बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण व श्री. रामेश्वर युवा मित्र मंडळ भोयडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात विशेष तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये हर्निया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, महिलांची गर्भाशय तपासणी, अल्सर, थायरॉईड, स्तनाचा कॅन्सर, मुळव्याध, मुतखडा व इतर जनरल आजाराची तपासणी करण्यात येणार आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया अल्पदरात होणार आहे. या शिबिराला येताना नागरिकांनी रेशन कार्ड, ओळखपत्र व जुने तपासणी रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक आहे. तरी या शिबिराचा लाभ करूळ गावातील नागरिकांनी तसेच तालुक्यातील इतर गावातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हिंदुराव पाटील यांनी केले आहे.











