भाजप मालवण तालुका बुथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग

आचरा जामडुल रिसॉर्ट येथे आज आयोजन 

प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली, बुथ सशक्तीकरण अभियान प्रमुख महेश सारंग, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत मार्गदर्शन करणार

 

मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी मालवण यांच्या वतीने मालवण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शक्ती केंद्रप्रमुख शक्ती केंद्र प्रभारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद प्रभारी यांचा संयुक्त प्रशिक्षण वर्ग सशक्ती अभियान आज शुक्रवार 3 मार्च रोजी सकाळी १० : ३० वाजता आचरा जामडुल रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

 

या मेळाव्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली, बुथ सशक्तीकरण अभियान प्रमुख महेश सारंग, भाजप पदाधिकारी अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व संबंधित यांनी उपस्थित राहावे. याबाबत माहिती मालवण भाजप कार्यलयातून देण्यात आली.