
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलचा शासकीय रेखाकला (एलिमेंटरी) परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. अ श्रेणीत २१ व ब श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर क श्रेणीत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षिका मुग्धा पाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
अ श्रेणीत रिद्धी धुळप, गीता गायकवाड, माही सावंत, आयुषी चौगुले, मुग्धा नेवरेकर, मिताली नांदगावकर, नित्या फणसे, मधुरा पाटील, श्रेया राऊत, प्रतिज्ञा सावंत, श्रीयांश रसाळ, सानिका अल्लोळकर, हर्षा तोडणकर, सारा वायंगणकर, अर्णव पानवलकर, चैतन्या देवरूखकर, समृद्धी सावंत, तन्वी सागवेकर, आर्या गोडबोले, अंतरा पिलणकर, श्रेयस बागुल यांनी यश मिळवले. ब श्रेणीमध्ये तनया भाटकर, वैदही ठाकरे, स्वरा बनप, नंदिता हळदणकर, गार्गी लोटणकर, शंतनू सनगरे, करण गुढे, राजवी विचारे, श्रेयस खानविलकर, अथर्व लिमये, सोहम आडिवरेकर, तनया सागवेकर, पवित्रा नागवेकर, कीर्ती सावंतदेसाई, प्रेक्षा पिलणकर यांनी यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक वसंत आर्डे, भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष नमिता कीर, कार्यवाह सुनील वणजू, खजिनदार नचिकेत जोशी, दादा कदम, कलाशिक्षक रूपेश पंगेरकर, अजित मुळीक यांनी केले.











