सातोसेत रविवार १८ रोजी महाआरोग्य शिबीर

सातोसे ज्येष्ठ नागरिक संघाचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) :   सातोसे येथील ज्येष्ठ नागरिक संघ व कोल्हापूर येथील अथायु मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सातोसे जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथे रविवार १८ फेब्रुवारी रोजी विविध आजारांवर मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सदर शिबीर होणार आहे.

या शिबिरात हृदयविकार, हाडांचे विकार, कॅन्सर, मेंदू, मणका, किडनी, मुतखडा व प्रोस्टेट, डायबेटिस या आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर रुग्णांना त्यांच्या आजारावर होणारी मोफत शस्त्रक्रिया कोल्हापूर येथील अथायू हॉस्पिटलमध्ये केली जाणार आहे. सदरच्या शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतून केल्या जाणार आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधारकार्ड धारकांना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. यात अँजीओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, मुतखडा प्रोस्टेट, हाडांचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याची लिगामेंटचे शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅम्प मधील सहभागी पेशंटला ६ हजार ५०० रुपयांची अँन्जिओग्राफी मोफत केली जाणार आहे. मुतखडा ऑपरेशन साठी रुग्णाकडे एक महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे. इच्छुक रुग्णांनी नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी बबन सातोसकर (९४२२७०४४५०), गोविंद पेडणेकर, रामदास मयेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.