घाणेखुंट मध्ये २२ रोजी रंगणार नृत्याविष्कार २०२४.

 

केतन सुरेश कांबळे प्रतिष्ठान चे आयोजन.

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे राज्यस्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा रंगणार असून राज्यभरातून अनेक संघांनी येथे आपला प्रवेश निश्चित केला आहे. केतन सुरेश कांबळे प्रतिष्ठान घाणेखुंट च्या वतीने २२ रोजी रात्री ८ वाजता या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

घाणेखुंट येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चे संचालक श्री.सुरेश कांबळे यांचे सुपुत्र कै. केतन सुरेश कांबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या राज्यस्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नामवंत परीक्षकांच्या परीक्षणातून उत्कृष्ट नृत्याविष्कार निवडले जाणार असून ते सादर करणाऱ्या संघांना येथे सन्मान चिन्ह व रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. शेखर निकम (आमदार चिपळूण) ,श्री. योगेश कदम (आमदार खेड), श्री. बाबाजीराव जाधव (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. जयंद्रथ खताते(प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. अजय बिरवटकर(अध्यक्ष-महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट) व श्री. शशिकांत चव्हाण (शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नागिरी) हे उपस्थित राहणार आहेत. घाणेखुंट येथे प्रथमच अशा प्रकारच्या राज्यस्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा होत असल्यामुळे पंचक्रोशी सह तालुक्यातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.