रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक-रत्नागिरी यांच्यावतीने रविवार दि.२५ फेब्रु. रोजी रत्नागिरीतील प्रथितयश कवी, आणि नवोदित कवींची बहारदार काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
साहित्य, वाचन चळवळ वाढीस लागावी, या हेतूने नेहमीच कार्यरत असणार्या जनसेवा ग्रंथालयातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई सभागृह, शेरेनाका-रत्नागिरी येथे सायंकाळी ४ वा. हे काव्यसंमेलन होत आहे.
जेष्ठकवी, कथाकार अशोक लोटणकर हे या संमेलनाचे अध्यक्षपद भुषविणार आहे. आद्य गझलकार देविदास पाटील, कवयित्री सुनेत्रा जोशी, गझलकार संजय कुळे, गझलकार विजयानंद जोशी या कवींची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासोबत रत्नागिरीतील नवोदित कवींनाही या संमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.
सर्व रसिक, श्रोते, साहित्य, काव्यप्रेमी, वाचक, सभासद यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, आणि काव्यसंमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केले आहे.










