रत्नागिरीत प्रभाग ३ मध्ये माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांच्या कार्यालयात मन की बातचे प्रक्षेपण

 

जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवींची उपस्थिती

रत्नागिरी : प्रत्येक महिन्यात नव्याने ऊर्जा देणारा आणि नवीन कार्य करण्याची प्रेरणा देणारा मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आज सादर झाला. याचा ११० वा भाग आज शहरातील प्रभाग तीनमधील बूथ क्र. १७१ मध्ये म्हणजेच स्टेट बँक कॉलनीत माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांच्या कार्यालयात ऐकण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत प्रमुख उपस्थित होते.

 

मन की बात कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, शहर सरचिटणीस शोनाली आंबेरकर यांचे स्वागत प्रभाग क्रमांक तीनच्या वतीने गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झालेले नितीन गांगण, राजेश नेने आणि सौ. मेधा कुळकर्णी यांचा कमळचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 

या वेळी महिला कोषाध्यक्ष सौ. सायली बेर्डे, माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, खजिनदार शैलेश बेर्डे, ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन गांगण, खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सौ. ऋतुजा कुलकर्णी, युवा मोर्चाचे प्रवीण देसाई, प्रसिद्ध ठेकेदार ओमकार गर्दे, संजीव बने, अमेय रायकर, तुषार देसाई,निलेश नेने, शिरीष सोहनी,सुरज बने, भास्कर उपळेकर, राजू भाताडे व नागरिक उपस्थित होते. या वेळी पत्रकार मकरंद पटवर्धन यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.