
नितेश राणे आगे बढो : युवकांची जोरदार घोषणाबाजी
गावातील विविध विकास कामांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
वैभववाडी | प्रतिनिधी : आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कोळपे मुस्लिम समाज वस्तीतील विविध विकास कामांची शुभारंभ पार पाडला. मुस्लिम बांधवांनी आमदार नितेश राणे यांचे गावात जंगी स्वागत केले. नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. भारतीय जनता पार्टीचा.. विजय असो. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कोळपे येथील कब्रस्तान येथे संरक्षण भिंत बांधणे, कोळपे बादशहा नंदकर घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कोळपे नाचरे घर येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, बाळा हरयाण प्राची तावडे, आईशा लांजेकर, राजेंद्र राणे व भाजपा पदाधिकारी, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम युवकांनी आमदार नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.












