
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरवली खुर्द मुख्य रस्ता ते नवलादेवी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या हस्ते झाले.
वेरवली खुर्द येथे डोंगरी विकास कार्यक्रम सन २०२२ -२३ अंतर्गत आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून मुख्य रस्ता ते नवलादेवी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे मंजूर झाले असून सदर कामाचे भूमिपूजन गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी हर्दखळे सरपंच गणेश इंदूलकर, वेरवली खुर्द सरपंच सुनिल खुलम, उपसरपंच सुरज कुडतडकर, गावकर अरुण डोळे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य भिकू जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, विकास सोसायटी चेअरमन भालचंद्र बोडस, ग्रा.पं सदस्य महेश शिंदे, भगवान राणे, डाॅ.सौरभ पाध्ये, राजू काका सरदेसाई, बाळ्याभाऊ सरदेसाई, कांता सरदेसाई, श्रीधर राणे, बाळ्या खेडेकर, मंदिराचे पुजारी नंदु आठल्ये, अमोल बोडस, विजयकुमार बोडस, संजय प्रिंदावणेकर, विक्रम आलीम, सुनिल डोळे, मधुकर पाध्ये, युवकचे गुणवंत जाधव,राघवेद्र होल्ला,महेश ठाकूर,श्रीनिवास आठल्ये,वल्लभ आठल्ये,आनंद मुळ्ये,चंद्रकांत जोशी,नितीन जोशी,ऋषिकेश चव्हाण, तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












