रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील वायंगणी फाटा येथे सार्वजनिक ठिकणी दारु पिणार्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.50 वा. करण्यात आली.
राहुल जनार्दन चंदुरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस नाई प्रशांत गोविंद लोहळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी संशयित हा वायंगणी फाटा येथील अंतर्गत जाणार्या रस्त्याचे बाजुला सार्वजनिक ठिकाणी दगडी चिर्यावर बसून बिअर पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे









