लोकशाही दिन ४ मार्चला

 

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे मार्च २०२४ चा लोकशाही दिन सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनासाठी नागरीकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील
उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.