ओटवणे(प्रतिनीधी) धर्मवीर संभाजी महाराज बलिदान सप्ताहा निमीत्त असनिये शिवतेज मंडळ आणि असनिये ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २० हून अधिक रक्तदात्यानी या शिबिरात सहभाग नोंदवला.शिवतेज मंडळ नेहमीच अनेक अभिनय उपक्रम आपल्या मंडळाच्या मार्फत ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवत आहे.त्यातच रक्तदान सारखा आदर्शवत उपक्रम शिवतेज मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांनी सलग दुसऱ्या वर्षी राबविला .असनिये सारख्या दुर्गम भागात एखादा उपक्रम राबविताना अनेक समस्येना सामोरं जावं लागत मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने ते सहज शक्यही होत.मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात यूवा वर्ग,युवतींसह महिलांचाही समावेश होता.
हे शिबिर असनिये प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन असनिये सरपंचा सरपंच रेश्मा सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पडवे येथील एस .एस. पी. एम. हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे डॉ मनिष यादव, उपसरपंच साक्षी सावंत सामाजिक कार्यकर्ते प्रितेश ठिकार, तांबुळी उपसरपंच जगदिश सावंत, शिवतेज मंडळाचे अध्यक्ष दिनेश सावंत, उपाध्यक्ष सचिन कोलते सचिव प्रशांत ठिकार आदी मान्यवर उपस्थित होते.
सह्याद्री प्रतिष्ठान हिन्दुस्थान सिंधुदुर्ग विभागाच्या रणरागिणी प्रशासक सिया गावकर यानीही या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. शिवतेज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे असनिये यासारख्या दुर्गम गावात हे शिबिर यशस्वी होवू शकले.याबद्दल एस एस पी एम हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे डॉ मनिष यादव यानी शिवतेज मंडळाचे कौतुक केले.
या शिबिरासाठी पडवे येथील एस एस पी एम रक्तपेढीचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. याबद्दल त्यांचे शिवतेज मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक प्रितेश ठिकार तर आभार दर्शन सावंत यानी मानले.











