महावितरणकडून कारवाईचा बडगा, लक्ष्यपूर्तीसाठी पथकांनी कसली कंबर
खेड(प्रतिनिधी)
महावितरण कंपनीच्या तालुक्यातील खेड व लोटे उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्राहकांकडून वीजबिलासह मागील थकबाकी मार्चअखेरपर्यंत भरणा करण्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. वसुली पथकाने गेल्या दोन आठवड्यात ७० हजार रूपयांची थकबाकी असलेल्या ३३, ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्यातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी, दिवाबत्ती, सार्वजनिक पाणीपुरवठा व शासकीय/निमशासकीय कार्यालयांतील ७३८४ ग्राहकांकडे २ कोटी ५३ लाखांची वीजबिलाची थकबाकी आहे. यातील खेड उपविभागांतर्गत येणाऱ्या ४०८४. ग्राहकांकडे १ कोटी ३२ लाख तर लोटे उपविभागांतर्गतील ३३०० ग्राहकांकडे १ कोटी २१ लाखांची थकबाकी आहे. थकित रक्कमेच्या वसुलीसाठी पथकांकडून ग्राहकांचा कायमस्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केला जात असून ६९ हजार ९७२ रूपयांची थकबाकी असलेल्या खेड व लोटे विभागातील ३३ ग्राहकांचा मागील दोन आठवड्यात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ८ ग्राहकांकडे २८ हजार १९१ रूपयांची तर तात्पुरत्या स्वरूपात खंडित केलेल्या २५. ग्राहकांकडे ४१ हजार ७८१ रूपयांची थकबाकी आहे.
लोटे उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आंबवली शाखेत ६१० रूपयांची थकबाकी असलेल्या एका ग्राहकाचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कर्जी शाखेतील असलेल्या २ ग्राहकांचा कायमस्वरूपी, खोपी १२११० रूपयांची थकबाकी शाखेतील ५९० रूपयांची थकबाकी असलेल्या एका ग्राहकाचा तात्पुरत्या स्वरूपात, तर लोटे शाखेतील ११९९० रूपयांची थकबाकी रूपयांची थकीबाकी असलेल्या ५ जणांचा कायमस्वरूपा। तर ९१५० रूपयांची थकबाकी असलेल्या ३ ग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरठा खंडित करण्यात आला.
खेड उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भरणे शाखेत २४११३ रूपयांची थकबाकी असलेल्या १६ ग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात, असलेल्या एका ग्राहकाचा कायमस्वरूपी, तर खेड अर्बन शाखेत ४०९१ रूपयांची थकबाकी ५३६ रूपये थकबाकीच्या एका ग्राहकाचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. आर आला. आर ३ शाखेत ६७८२ रूपयांची थकबाकी असलेल्या ३ ग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तात्पुरत्या स्वरूपात खंडित केलेल्या ग्राहकांवर वीजपुरवठा पूर्ववत करून वीजबिलाच्या थकीत रक्कमेसह दंडाची रक्कम घेण्यासाठी देखील भरणा करावी लागत आहे.









