खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील साखरोली येथील श्री खेम देवीच्या शिमगोत्सवास २५ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलो आहे. देवस्थानची सहाण व मानकऱ्यांच्या घरी पालखी दर्शनाला जाईल. २६ रोजी भुवडवाडी, २७ रोजी म्हादेवाडी, मधलीवाडी, २८ रोजी मोरेवाडी, २९ रोजी गवळवाडी, ३० रोजी गवळवाडी येथील ग्रामस्थांच्या घरी पालखी दर्शनाला जाईल.









