लोटे मधील नोव्हल्स मॉलिक्यूज मधील ऑपरेटरचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील नोव्हल्स मॉलिक्यूज या कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ड्युटीवर असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला लोटेतील परशुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले , तेथे उपचारादरम्यान त्याचे २२ मार्च रोजी पहाटे ५ वाजता निधन झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मयत संभाजी अनंत पाटील ( वय ५२ , रा. धामणदेवी नवीन वसाहत ) हा लोटे येथील नोव्हल्स मॉलिक्यूज या कंपनीत ऑपरेटर म्हणून काम पाहत होता. ड्युटीवर असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी कर्मचारी यांनी त्याला उपचाराकरिता परशुराम हॉस्पिटल लोटे येथे घेऊन गेले उपचार सुरू असताना तो मयत झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले. याबाबत खेड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.