चिपळूण नगर पालिकेला कर वसुलीचे आदेश

Google search engine
Google search engine

७५ टक्के कर थकीत

रत्नागिरी । प्रतिनिधी : थकीत कर वसुलीसाठी आता शासनाकडून चिपळूण नगर पालिका प्रशासनावर दबाव वाढू लागला आहे. आर्थिक वर्ष अखेर असल्याने किमान ७५ टक्के थकबाकीची रक्कम वसुल करण्याचे आदेश मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना देण्यात आले आहे. ही वसुली न झाल्यास अधिकार्‍यांवर कारवाई करण्याबरोबरच नगर पालिकेला शासनाकडून देण्यात येणार्‍या १५ व्या वित्त आयोगासह अन्य विकास निधीला टाच लावण्याचा इशारा देण्यात आा आहे. यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली असून कर वसुलीसाठी शहरात वीस पथके तैनात करीत मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.