दोन्ही उन्हाळी स्पेशलचे आरक्षण खुले

खेड(प्रतिनिधी) उन्हाळी सुट्टीसाठी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन एलटीटी- थिविम उन्हाळी स्पेशल गाड्यांचे १३ एप्रिलपासून आरक्षण खुले झाले आहे. एलटीटी-थिविम ०११८७/०११८८ क्रमांकाची उन्हाळी स्पेशल १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीत दर बुधवारी तर परतीच्या प्रवासात १९ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. २२ डब्यांची स्पेशल पूर्णपणे वातानुकूलित असणार असल्याने पर्यटक कमालीचे सुखावले आहेत. ०११२९/०११३० क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस- थिविम स्पेशल २० एप्रिल ते ८ जूनदरम्यान दर शनिवारी तर परतीच्या प्रवासात २१ एप्रिल ते ९ जून या कालावधीत दर रविवारी धावणार आहे.