खेड(प्रतिनिधी) खेड शहरासह भरणे परिसरात वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन लावणाऱ्या विरोधात येथील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मोहीम तीव्र केली असून भरणे परिसरात केलेल्या कारवाई मध्ये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
भरणे येथील उड्डाणपूला खाली केलेल्या कारवाईत रोहन मधुकर बैकर रा भरणे व संकेत विलास काटकर रा भडगाव खेड यांनी आपली वाहने अनुक्रमे झायलो कार व टेम्पो वाहतूकीस अडथळा ठरतील अशी उभी करून ठेवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे







