राणे साहेबांना मोठे मताधिक्य मिळवून देणार!

कुंभारमाठ येथे भाजप महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ

अमित खोत | मालवण : भाजप महायुती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जोरदार प्रचार सर्वत्र सूरू आहे. कुंभारमाठ येथील श्री ब्राम्हण देव मंदिर येथे श्रीफळ ठेवून भाजप महायुती पदाधिकारी यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. राणे साहेबांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, महिला प्रांतिक सदस्या रश्मी लुडबे, सरपंच पूनम वाटेगावकर,उपसरपंच जिवन भोगावंकर, अशोक चव्हाण, गौरव लुडबे, राजेंद्र लुडबे, राकेश सावंत, दिलीप सांगवेकर, भगवान नेरुरकर, प्रिया गोवेकर, अनिता गोवेकर, आचल गावठे, आरती गुडेकर, अर्चना वाटेगावंकर, बाळकृष्ण गुडेकर, विनय गावकर, मनोज वाटेगावकर, रंगरावं वडर, सुनील वस्त, महेश पाटील, प्रकाश भोगावकर, सुंदर चव्हाण, सर्वेश भोगावकर, सदा चव्हाण, सुमित भोगावकर, मनोज डिचवलंकर, जगदीश शिरोडकर
संदीप फोडेकर ‎व अन्य उपस्थित होते.