सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवार दिनांक ४ मे रोजी, सकाळी साडेदहा वाजता, ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालई वाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘ज्येष्ठ नागरिक समस्या व समुपदेशन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, तरी कृपया सभेला वेळेत उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











