Record dance organized on the occasion of Hanuman Jayanti on 6th April at Gavtale
दापोली | प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील गावतळे येथील हनुमानवाडी येथे ६ एप्रिल रोजी रात्री ९:३० वा रेकॉर्ड डान्स आयोजित करण्यात येत आहेत. रेकॉर्ड डान्सची स्पर्धा घेतली जाणार नाही . स्थानिक कलाकारांना स्टेज मिळून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. या कार्यक्रमात दापोली तालुक्यातील कुठलाही स्पर्धक सहभागी होऊ शकतो.या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. एकुण निवडक २५ डान्सना प्रवेश दिला जाईल. ४ एप्रिलपर्यंत डान्सचा व्हिडिओ 9158795428 या वाँटसप नंबरवर पाठवायच आहे.२५ पेक्षा जास्त प्रवेश आल्यास निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्याची यादी प्रत्येकाच्या वाँटसप वर दिनाक ५ एप्रिल रोजी पाठविण्यात येईल असे आयोजकांनी कळविले आहे.सहभागी प्रत्येक डान्सला एक सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र व रोख स्वरुपात काही रक्कम देण्यात येणार आहे. सहभागी कलाकारास वयाची अट नाही. संपर्क: अजय पाटील. 7770037940 ,अक्षय पवार 8552880660, राम पवार 9370265689, निलेश गुरव 7208200923 यांच्याजवळ संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापक हनुमानवाडी ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ,नवतरुण युवक मंडळ ग्रामीण व मुंबई. गावतळे यांनी केलं आहे.