बॉक्साईड कंपनीचा मनमानी कारभार, कुंबळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे प्रशासनाकडे निवेदन

Arbitrary management of bauxite company, statement of villagers of Kumble Panchkroshi to the administration

मंडणगड |  प्रतिनिधी : रोवले ते करंजाडी येथून सुरु असलेल्या बॉक्साईट वाहतूकीचे मनमानी कारभाराचे विरोधात कुंबळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी 31 मार्च 2023 रोजी तहसिलदार मंडणगड यांच्याकडे तक्रारी निवेदन सादर केले आहे. या निवेदनातील माहीतीनुसार मंडणगड तालुक्यातील कुंबळे लाटवण पंचक्रोशीतील गावांमधून सध्या राजरोसपणे आणि नियमांचे उल्लंघन करुन सुरु असलेली बॉक्साईट वाहतूक येथील नागरीकांच्या जीवावर बेतत आहे वाहतूकीमुळे पंचक्रोशीत मोठे अपघात झाले आहेत. सार्वजनीक बांधकाम उपविभाग मंडणगड यांच्या ताब्यात असलेले रावेल उंबरशेत ते करंजाडी हे अंतर 60 किलोमीटर इतक्या लांबीचे आहे या मार्गावरील अनेक गावांमध्ये बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशा परिस्थितीमध्ये रस्त्यांची रुंदी साईडपट्टीची अवस्था पाहीली तर मोठ्या वाहनांच्या रस्त्याखाली न उतरल्याने व साईडपट्टी नसल्याने लहान वाहनांचे मोठे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

वाहतूकीचे नियम न पाळता दहा चाकी व सहा चाकी गाड्या ओव्हरलोड करुन रस्त्यावर चालत असतात नागमोडी वळणांचा रस्ता असल्याचे बॉक्साईटचा माल रस्त्यावर सांडतो त्याचा त्रास लहान वाहनांना होतो. वाहतूकी करणाऱ्या ट्रन्सपोर्ट कंपनीच्य डंपरेच चालकांमध्ये जास्तीत जास्ती ट्रीप मारण्याच्या स्पर्धेत डंपर बेदरकारपणे वेगाने चालविले जातात. त्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या स्थानीक नागरीकांमधून प्रवास करणे कठीण झाले असून ते जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. वाहतूकीमुळे या मार्गावरील सर्व रस्ते खड्डेमय बनुन नादुरुस्थ झाले आहेत. यातून शासन व यंत्रणेची दिशाभुल केली जात आहे. सिंगल रोडवरुन क्षमतेपेक्षा अधिक बॉक्साईटची वाहतूक सुरु आहे ती त्वरीत बंद करावी अन्यथा आंदोलन कऱण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी सरपंच किशोर दळवी, अरुण माने, अलताफ पेटकर, कृष्णा जगताप, लुकमान चिखलकर, आदम चौगुले, जगदीश मालुसरे, सिध्देश पांढरे, संदेश खांडेकर, देविचंद गणवे यांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत सर्व संबंधीतांकडे पोहच करण्यात आली आहे