खेड (प्रतिनिधी) शिमोगा येथे झालेल्या १५व्या ऑल इंडिया ओपन रोलर राष्ट्रीय स्केटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत भरणे- बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मृणाल भोसले हिने सुवर्ण पदक पटकावले. तिची आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत राज्यातील ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. १३ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रशालेतील ७वीतील मृणाल भोसले हिने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत गटनिहाय सुवर्णपदकावर बाजी मारली. तिला विजय निगडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.











