खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील वरवली- देऊळवाडी येथील सुपुत्र व मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या विलास तुळशीराम यादव यांचा सेवा बजावताना मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी रात्री ८ वाजता डोंबिवली – नवापाडानजीकच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मतदानाच्या दिवशी ड्युटी बजावत असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सृश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले असता मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.










