सुकिवलीतील रस्ता डांबरीकरणास प्रारंभ

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील सुकिवली येथील रस्ता डांबरीकरणासाठी आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास देखील प्रारंभ झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्या
नेतृत्वाखाली आमदार योगेश कदम यांना निवेदन
सादर करत रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी केली होती.
 सतत वर्दळीच्या रस्त्यासाठी आमदार कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्षात कामास देखील प्रारंभ झाल्याने पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या मार्गातील अडथळा दूर झाला असून वाहनचालकांची चिंता मिटली आहे.