बारावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड राज्यात झळकले; मुली आघाडीवर
रत्नागिरी | प्रतिनिधी :
गुणवत्तेमध्ये राज्यात आम्हीच अव्वल आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करत कोकण बोर्ड हे बारावीच्या परीक्षेत अव्वल ठरले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ-पुणेतर्फे घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल 21 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. त्यामध्ये कोकण विभागाचा निकाल 97.51 टक्के लागला आहे. यंदाही मुलीनी निकालामध्ये बाजी मारली आहे.
राज्यात बारावीमध्ये कोकण विभागीय मंडळाने सलग आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. तर या यशात मुलीचं पुन्हा एकदा पुढे असून याही परिक्षेत विद्यार्थीनिनी 98.60 टक्केवारी प्राप्त करत बाजी मारली आहे. गतवर्षी 2023 मध्ये मुलीं ही टक्केवारी 97.41 इतकी होती.
राज्यात कोकण : 97.51 टक्के, पुणे ९४.४४ टक्के, कोल्हापूर९४.२४ टक्के, अमरावती ९३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के, नाशिक ९४.७१ टक्के, लातूर ९२.३६ टक्के, नागपूर ९३.१२ टक्के तर सर्वात कमी टक्केवारी मुंबई विभागाची ९१.९५ टक्के इतकी आहे. कोकण विभागात जिल्हानिहाय निकालामध्ये रत्नागिरीचा निकाल 97.07 टक्के तर सिंधुदुर्ग जिह्याचा 98.33 टक्के लागला आहे. 2019 मध्ये कोकण विभागाची 1.62 टक्के निकालात घट झाली होती. पण 2020 मध्ये त्यात 2.66 टक्के वाढ झाल्याने घट भरून निघाली होती. 2020 मध्ये कोकण विभागाचा निकाल 93.23 टक्के इतकी वाढ झालेली होती. 2021 मध्ये 99.81 टक्के, सन 2022 मध्ये कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के इतका राज्यात अव्वल लागला होता. 2023 मध्ये लागलेल्या निकालात आधीच्या निकालाच्या तुलनेत 1.20 टक्के इतकी घट झाली असून हा निकाल 96.01 टक्के इतका लागला होता. यंदा मात्र 2024 मध्ये गतवर्षीच्या तुलनेत निकालात 1.5 टक्के इतकी वाढ झाली आहे.
कोकण विभागाच्या शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा 99.00 टक्के, कला शाखेचा 993.76 टक्के, वाणिज्य 98.46 टक्के, तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल 96.64 टक्के आणि टेक्निकल सायन्स शाखेचा यावर्षी 2024 मध्ये तब्बल 93.24 टकके इतका लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेसाठी प्रविष्ट 9478 विद्यार्थ्यांपैकी 9384 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी प्रविष्ट 5632 विद्यार्थ्यांपैकी 5281 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेसाठी 9522 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 9376 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रविष्ट असलेले 865 विद्यार्थ्यांपैकी 836 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. टेक्निकल सायन्सच्या प्रविष्ट 296 विद्यार्थ्यांपैकी 276 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातून परीक्षेस बसलेल्या एकूण 25,793 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 25,153 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ात 16,721 विद्यार्थ्यांपैकी 16,232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, हा निकाल 97.07 टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्य़ातून परीक्षेस बसलेल्या 9014 विद्यार्थ्यांपैकी 9072 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर हा निकाल 98.33 टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी जिह्यातून विज्ञान शाखेमध्ये 6143 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 6058 विद्यार्थी (98.61 टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 3769 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 3509 विद्यार्थी (93.10 टक्के) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेमध्ये 6248 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 6124 विद्यार्थी (98.01 टक्के) उत्तीर्ण झाले. तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 309 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 304 विद्यार्थी (98.38 टक्के) उत्तीर्ण झाले. तसेच टेक्निकल सायन्सच्या 252 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 237 विद्यार्थी (94.04 टक्के) उत्तीर्ण झाले.
तर सिंधुदुर्ग जिह्यातून विज्ञान शाखेसाठी 3335 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 3326 विद्यार्थी (99.73 टक्के)उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 1863 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 1772 विद्यार्थी (95.11 टक्के) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेसाठी 3274 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 3252 (99.32 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमातून 556 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 532 विद्यार्थी (95.68 टक्के) यशस्वी झाले. तर टेक्निकल सायन्स मध्ये 44 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी सर्व 39 विद्यार्थी (88.63 टक्पे) उत्तीर्ण झाले.
त्याचबरोबर यावर्षी कोकण बोर्डात रत्नागिरी व र्सिधुदूर्ग या जिल्ह्य़ातून पूनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये 914 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 734 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल 80.30 टक्के लागला आहे.
कोकण विभागात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी कोकण विभागातून एकूण 12,850 प्रविष्ठ मुलांपैकी 12,390 मुलगे (94.42 टक्के) उत्तीर्ण झाले. तर परिक्षेला एकूण 12,943 प्रविष्ठ मुलींपैकी 12,763 मुली (98.60 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 2.18 टक्के अधिक आहे. त्यामुळे मुलांपेक्षा अधिक टक्केवारी मिळवत यावर्षी 2024 मध्येही मुलींनी यशस्वीतेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
कोकण विभागाने सातत्याने आपल्या यशाची उंची संपूर्ण राज्यात कायम ठेवली असून स्वतंत्र बोर्ड झाल्यापासून कोकण बोर्डाने कधीही अव्वल स्थान सोडलेले नाही.











