रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या विजयाचा वेंगुर्ले येथे शिवसेनेकडून जल्लोष…
वेंगुर्ले : प्रतिनिधी
रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे कॅम्प येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लाडू वाटून व फटाके फोडून घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम, युवा शहरप्रमुख संतोष परब, महिला शहरप्रमुख ऍड.श्रद्धा बाविस्कर – परब , संजय परब , सुशील परब, बाळा परब, सिल्वान डिसोजा, किरण कुबल , संजय परब, भाऊ वालावलकर , आपा मांजरेकर , गजानन गावकर, मनी रेवणकर , देविदास वालावलकर , मनाली परब , रसिका राऊळ , मनाली गोळम, संजना पिंगुळकर , गीतांजली गावकर , पुंडलिक हळदणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उमेश येरम यांनी नारायण राणे यांनी या भागातील केलेली विकासकामे यामुळे ते प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी ही मतदारसंघात ना.राणे यांच्यासाठी काम केले.वेंगुर्ले तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत असून पुढील दोन वर्षात ना.राणे यांच्यामुळे वेंगुर्ले चा निश्चितपणे कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त केला.











