वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई व ग्रामीण तसेच माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मंगळवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता धम्म पूजा पाठ, सकाळी ११. ३० ते १२ वा. स्वागत व प्रास्ताविक, दुपारी १२ वाजता बौध्दधम्म अभ्यासक डी. के. पडेलकर ( देवगड) यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन. तसेच समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा गुणगौरव व मान्यवरांचे सत्कार, दुपारी स्नेहभोजन व त्यानंतर तालुक्यातील कलाकार धम्म गिते सादर करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व धम्म बंधू भगिनींनी उपस्थित राहावे. असे आवाहन ग्रामीण शाखेचे अध्यक्ष भास्कर जाधव, शारदा कांबळे, सचिव रवींद्र पवार, रुचिता कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, मोहिनी कांबळे यांनी केले आहे.











